June 13, 2022
by Chandrakant Dada Patilसंस्थेतर्फे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीबरोबर संलग्न होवून चॅरीटी दवाखाने सुरू करेल. या दवाखान्यासाठी लागणारी जागा (अंदाजे 500 स्क्वे. फुट) ग्रामपंचायत उपलब्ध करुन देईल. जागेव्यतिरिक्त सदर प्रकल्पामध्ये कुठलाही राजकिय हस्तक्षेप टाळण्याचा पुर्ण प्रयत्न केला जाईल.
सदर दवाखान्यामध्ये एम.बी.बी.एस/बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस. या अहर्तेचे डॉक्टर्स व एक मदतनीस उपलब्ध असतील. सकाळी 9 ते 1 आणि संध्याकाही 4 ते 8 या वेळेत ते सेवा देतील.
- डॉक्टरांकडून तपासणी आणि दवाखान्यात उपलब्ध असलेल्या गोळ्या व इंजेक्शन्स देण्यात येतील.
- ड्रेसींग, लहान जखमांचे टाके घालणे आदी प्रोसिजर्सही केल्या जातील.
- स्त्रियांचे आरोग्य, जेष्ठ्य नागरीकांचे आरोग्य, लहान मुलांचे आरोग्य, अपंग व्यक्तींची काळजी याबद्दल प्रबोधनात्मक कार्यक्रमही आयोजित केले जातील.
* याव्यतीरीक्त आवश्यक असणारी औषधांसाठी प्रिस्क्रिप्शन देण्यात येईल. ज्यासाठी साधारणपणे 10% डिस्काऊंट मिळेल.
* पॅथॉलॉजी लॅब/डायग्नोस्टिक सेंटर्स यामध्येही डिस्काऊंट मिळेल.
* तसेच जर एखाद्या रुग्णाला हॉस्पीटलमध्ये भरती करावे लागले तर संस्थेच्या संलग्नित रुग्णालयातही सवलतीच्या दरात उपचार केले जातील.